बीड, दि.3 (लोकाशा न्युज):- लोखंडी सावरगाव येथील भरती प्रकरणी ब्लॅकलिस्ट असणाऱ्या कंपनी द्वारे भरती केले जाणाऱ्या पदामध्ये बोगसगिरी करत डॉ. साबळे यांनी नियुक्ती दिल्या प्रकरणी विधान परिषदेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केले असता उत्तर देताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे बीड जिल्हा शल्यचिकित्सक असलेल्या डॉक्टर सुरेश साबळे यांना निलंबित करण्याची घोषणा विधान परिषदेमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.