बीड, दि. 31 (लोकाशा न्यूज) : आंतरराष्ट्रीय गणित विषयाच्या ऑलिम्पियाड (2022-2023) (लेव्हल-वन) स्पर्धेत येथील पोदार इंटरनॅशनल स्कुलमधील इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेणारी आत्मजा पांगरीकर हिने शाळेतून प्रथम तर स्वामिनी अभिजित नखाते हिने व्दितीय क्रमांक मिळविला आहे. त्याचबरोबरच राजलक्ष्मी मिसाळ, स्पृहा साओजी आणि आदी भारदवाज यांनीही या स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे. या यशाबद्दल या विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य गणेश काकडे यांच्या हस्ते गोल्ड मेडल अन् प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहे.
पोदार इंटरनॅशनल या शाळेचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. या शाळेत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आज मोठ-मोठ्या पदावर पोहचत आहेत, त्यामुळेच या शाळेत आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी पालकांचा ओढा अधिक असतो, दर्जेदार शिक्षणामुळे प्रत्येक परिक्षेत, स्पर्धेत या शाळेतील विद्यार्थी चमकतो म्हणजे चमकतोच. सन 2022-2023 या वर्षात झालेल्या आंतरराष्ट्रीय गणित विषयाच्या ऑलिम्पियाड परिक्षेत या शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. सध्या इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेणारी आत्मजा पांगरीकर हिने या स्पर्धेत शाळेतून प्रथम तर स्वामिनी अभिजित नखाते हिने व्दितीय क्रमांक मिळविला आहे. त्याचबरोबरच राजलक्ष्मी मिसाळ, स्पृहा साओजी, आणि आदी भारदवाज यांनीही या स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे. या यशाबद्दल या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य गणेश काकडे यांच्या हस्ते गोल्ड मेडल अन् प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी शाळेच्या उपप्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.