बीड(प्रतिनीधी):- नवगण राजुरी सर्कल मधील वंजारवाडी,तिपट्टवाडी,मुर्शदपुर या तिन्ही गावी बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक नियोजन समिती मधून तिन्ही गावच्या स्मशानभूमी साठी प्रतेकी 5 लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे.गेल्या 70 वर्षात या गावात स्मशान भूमी मंजूर नव्हती ती खासदार ताई यांच्या माध्यमातून मंजुर झाल्या आहेत.या मुळे या गावची मोठी अडचण दूर होणार आहे.सबका साथ आणि सबका विकास हे ब्रीद वाक्य घेऊन काम करणाऱ्या खासदार प्रितम ताई मुंडे यांच्यामुळे हा विकास निधी गावच्या पदरात पडला आहे.माणूस गेल्यानंतर त्याची अंत्ययात्रा,अंतिम संस्कार करण्यासाठी चांगली जागा पाहिजे.कधी कधी पावसाळ्यात अंत्यविधी करण्यासाठी गावकऱ्यांची दमछाक होत असते हा स्मशान भूमी ला निधी मिळाल्यामुळे ह्या सर्व अडचणी गावकऱ्यांच्या दूर होणार आहेत.काही राजकीय नेते गावचा फक्त राजकीय मता करीता वापर करून घेतात परंतु नंतर गावच्या विकासाकडे दुर्लक्ष करतात.परंतु विकासाच्या महामेरू असलेल्या पंकजाताई मुंडे,खा. प्रितमताई मुंडे ह्या गावे विकसित करण्यासाठी नेहमी प्रयत्नशिल असतात.येणाऱ्या काळात पंकजा ताई,खा.प्रीतमताई यांच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणावर विकास कामासाठी निधी मंजूर करू,असे प्रतिपादन स्मशानभूमी कामाच्या शुभारंभाप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा बीड जिल्हा सरचिटणीस ॲड.सर्जेराव तांदळे यांनी केले.यावेळी गावातील सरपंच,ज्येष्ठ नागरिक,तरुण वर्ग उपस्थित होते.गावाला स्मशान भूमी मंजूर केल्याबद्दल खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांचे सरपंच वैजनाथ नाना तांदळे,पांडुरंग राख,लक्ष्मण पवार, अंगंद तांदळे,ढाकणे मामा, पवळ साहेब,सिध्देश्वर सातपुते,समर्थ तांदळे,कुटे मामा,तिपट्टवाडी च्या सरपंच जनाबाई नामदेव शेंडगे
उपसरपंच विष्णु प्रल्हाद जाधव
ग्रामस्थ,अशोक राजाभाऊ तिपटे,सचिन तिपटे,हनुमान प्रभु शेंडगे,विक्रम शेंडगे,विलास रामा जाधव, निवृत्ती सर्जेराव शेंडगे, लक्ष्मण महादेव शेंडगे, मुर्शदपुर सरपंच राजकुमार कचरु वखरे ग्रामस्थ अशोक रोडे, मधुकर जावळे, अशोक जगताप, बाळासाहेब पटाईत, कैलास जावळे,प्रताप जगताप आदीनी आभार मानले.