बीड

तुकाराम मुंडे कृषी विभागाचे सचिव तर अजित कुंभार आता अकोल्याचे कलेक्टर, राज्यातील 41 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या,अमोल येडगेंकडे पुण्याच्या ‘एमएससीईआरटी’ची जबाबदारी


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : राज्य शासनाने शुक्रवारी 41 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये बीडला सीईओ म्हणून कर्तव्य बजावणारे अजित कुंभार आता अकोल्याचे कलेक्टर बनले आहेत. तसेच अमोल येडगेंकडे पुण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचप्रमाणेच यामध्ये तुकाराम मुंडे यांचीही बदली करण्यात आली आहे, त्यांच्याकडे कृषी विभागाचे सचिव ही नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अमोल येडगे आणि अजित कुंभार यांनी बीड जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावरून अत्यंत चांगल्या पध्दतीने काम केलेले आहे. अजित कुंभार यांनी तर बीड जिल्ह्यात जवळपास आडीच वर्ष कर्तव्य बजावले होते, बीड जिल्ह्यातून त्यांची मुंबई महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावर बदली झाली होती, आता त्यांच्याकडे अकोला जिल्हाधिकारी म्हणून नवी जबाबदारी देण्यात आली आहे. ते जिल्हाधिकारी म्हणूनही अत्यंत चांगल्या पध्दतीने कर्तव्य बजावतील असा विश्‍वास आहे. त्याचप्रमाणे बीडचे तत्कालिन सीईओ आणि यवतमाळचे विद्यमान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे पुण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचप्रमाणेच यामध्ये तुकाराम मुंडे यांचीही बदली करण्यात आली त्यांच्याकडे कृषी विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!