बीड

बीडमध्ये खळबळ, एमडी परिक्षेत नापास झालेल्या डाॅ. मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खुन, बीडच्या अंकुश नगर भागातील धक्कादायक घटना, शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा नोदविण्याची प्रक्रिया सुरू

बीड : वय झाल्यानंतर सांभाळण्यासाठी मुलगा हवा, यासाठी अनेक जण मुलाचा जन्म झाल्यानंतर मोठ्या उत्साहात त्या मुलाचे स्वागत करत असतात. वंशाला दिवा असणार्या डाॅॅ. मुलानेच बीडमध्ये जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी साहित्याचा मारा करत खुन केल्याची धक्कादायक घटना शहरातील अंकुश नगरमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेने बीड शहरामध्ये खळबळ उडाली आहे. आईच्या फिर्यादीवरून मुलावर खुणाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सुरू आहे.

बीड शहरातील अंकुश नगर भागात राहणार्या कुलकर्णी परिवारातील मुलगा सुधिर सुरेश कुलकर्णी हा २०१० मध्ये बीएएमएस मध्ये पास झाला होता. तो गेल्या तीन वर्षापासून एमडीचे शिक्षण घेत होता, परंतु यात त्याला अपयश आल्यानंतर तो नैराश्यात गेला होता. यात त्याने आज मध्यराञी जन्मदात्या बापाचा (सुरेश काशीनाथ कुलकर्णी वय ७०) खुन केला. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीसांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला. फिर्यादी सुरेखा कलकर्णी वय ६२ यांच्या फिर्यादीवरुन मुलगा सुधिर कुलकर्णी वय ३८ यांच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड व त्यांची टिम करत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!