गेवराई: लोकाशा न्युज
झोपडपट्टी भागात राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेच्या अंगावर घराची भिंत पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील झोपडपट्टी भागात गुरुवारी रोजी सकाळी ९ च्या सुमारास घडल्याची माहिती समजले आहे.
सुमनबाई शेषेराव अडागळे वय ५५ वर्षे रा.धोंडराई असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.भिंत अंगावर पडल्याने सुमनबाई ह्या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले परंतू त्या गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान महसुल प्रशासनाकडून घटनास्थळी भेट देवून घटनेचा पंचनामा करण्यात आला असल्याची माहिती समजले आहे.
@ चौकट : –
घरकुलसाठी फोटो काढला होता पण घरकुलाचे काय?
भिंत अंगावर पडलेल्या सुमनबाई आडागळे यांची परिस्थिती हलाखीची असल्याने सुमनबाई आडागळे ह्या बिकट अवस्था असलेल्या घरात राहत होत्या. त्या राहत असलेल्या घराला तडे पडलेले असून आपल्याला राहायला आसरा मिळेल या आशेने त्यांनी शासनाकडे मागणी करत घरकुलासाठी लागणारा फोटो देखील काढला होता.तो त्यांच्या घरात पाहायला मिळाला मात्र घरकुलाचे काय झाले हे मात्र समजू शकले नाही. असे असताना मात्र घरकुल योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरांचा लाभ गरजूंना मिळाला पाहिजे घरकुलाचा लाभ न मिळाल्याने अशा घटना समोर येतात.सुमनबाई आडागळे यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला असता तर तडे गेलेल्या घरात राहण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती आणि त्यांचा मृत्यूपासून बचाव झाला असता अशी चर्चा घटनास्थळी गावकऱ्यामध्ये सुरु होती.