बीड

अनुचित प्रकार घडले तर खैर नाही, डीवायएसपी संतोष वाळकेंनी बीडमधील कॉफी सेंटरांची घेतली झाडाझडती, नियम तोडल्यास गुन्हे दाखल करणार


बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : अनुचित प्रकार घडले तर खैर नाही, असा दम डीवायएपी संतोष वाळके यांनी दिला आहे. काल त्यांनी बीडमधील 13 कॉफी सेंटरची झाडाझडती घेतली, कॉफी सेंटरमध्ये थोडाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
बीडमधील असे काही कॉफी सेंटर आहेत जे की त्याठिकाणी मुलींना आणून मुली अश्‍लिल चाळे करतात, यासाठी कॉफी सेंटरवाले मुलांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेतात, मात्र हा सगळा प्रकारच चुकीचा आहे, कॉफी सेंटरमध्ये असे चुकीचे प्रकार घडू नयेत म्हणून गुरूवारी संतोष वाळके यांनी शहरातील 13 कॉफी सेंटरला भेटी देवून झाडाझडती घेतली. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याबाबत त्यांनी यावेळी चालक आणि मालकाला सुचना दिल्या आहेत. विशेष यावेळी त्यांना लेखी नोटीसही काढण्यात आली आहे. आपण बीड शहरात व्यवसाय करत असून आपल्या कॉफी शॉपमध्ये आपण अल्पवयीन मुलामुलींना तसेच कॉलेज मधील मुलामुलींना जास्त प्रमाणात शुल्क आकारणी करून त्यांना बसण्यासाठी आपल्या कॉफी शॉपमध्ये जागा उपलब्ध करून देत असल्याने आपण गैरकृत्यास-लैंगिक चाळे करण्यास चालणा देत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी शांततेस बांधा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो. हे गैरप्रकार टाळण्याकरिता दिलेल्या सुचनांचे पालन करावे, जर सुचनांचे पालन केले नाही तर आपणावर कलम 188 भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी, सदरची नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल, त्यानुसार कॉफी शॉप चालविण्याकरिता आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या संबंधित
कार्यालयाकडून काढून घ्याव्यात, कॉफी शॉप नियमानुसार वेळेत चालू ठेवावे, नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, कॉफी सेंटरमध्ये सीसीटीव्ही बसवावीत, कॉफी शॉपचे दरवाजे व आतील फर्निचर यांना काळ्या फिल्म न लावता ते पारदर्शक ठेवण्यात यावेत, कॉफी शॉपमध्ये येणारे व्यक्ती धु्रमपान करणार नाहीत याची दक्षता घ्यावी, कॉफी शॉफमध्ये कोणत्याही प्रकारची नशा आणणारे पेय, औषध, गोळ्या विक्री करण्यात येवू नयेत, कॉफी शॉपमध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी भेट पुस्तीका ठेवण्यात यावी, कॉपी शॉपमधील डेक, डॉल्बी व इतर ध्वनीक्षेपक व्यवस्था प्रदुषण नियमांचे उल्लंघन करणारी नसावी, कॉफी शॉपमध्ये येणारे मुला-मुलींचे नोंदी करीता रजिस्टर ठेवण्यात यावे, कॉफी शॉपमध्ये येणारे मुला-मुलींपैकी कोणी संशयीत वाटल्यास त्याची माहिती जवळील पोलिस ठाण्यात देण्यात यावी, अशा स्पष्ट सुचना डीवायएसपी संतोष वाळके यांनी दिल्या आहेत.

सुचनांचे पालन न केल्यास
गुन्हा दाखल होणार
डीवायएसपी संतोष वाळके यांनी बीड मधील कॉफी सेंटरची झाडाझडती घेवून कडक सुचना दिल्या आहेत. जर सुचनांचे पालन न केल्यास कलम 149 सीआरपीनुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!