बीड

अखेर स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी संतोष साबळेंच्या हाती, एसपींनी सोपवला कायमचा पदभार,बीड ग्रामीण ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी विश्‍वास पाटील तर वाहतूक शाखा अशोक मुदिराजांकडे



बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : येथील स्थानिक गुन्हेचे निरीक्षक सतीश वाघ यांची आठवडाभरापूर्वीच छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली होती. त्यानंतर बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक पदी संतोष साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सोमवारी (दि.3) काढले आहेत. तर त्यांच्या जागी बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या ठाणेदार पदी विश्‍वास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा ही पोलीस दलातील सर्वात महत्वाची शाखा आहे. त्यामुळे या पदावर बसणारा अधिकारी हा सतर्क व पदाला न्याय देणारा असला पाहिजे. स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती मिळावी यासाठी अनेकांनी लॉबिंग केल्याची चर्चा होते, त्यामुळे नियुक्ती कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. चोरी, दरोडा, घरफोडी यासह गुटखा, मटका अशा अवैध धंद्यांना आवर घालण्याचे साबळे यांच्यासमोर आव्हान असणार आहे. तसेच बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची तर जिल्हा वाहतूक शाखेला अशोक मुदिराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!