
बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर भाजपाचे कुशल जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंनी बीडमध्ये भव्य आणि दिव्य बैलगाडा शर्यतीचा पायंडा रचला. शेतकर्यांचा मित्र म्हणून त्यांची कायम धरपड असते. मोठी बहिण म्हणून राजेंद्र मस्केंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे प्रयत्न आणि आशीर्वाद कायम त्यांची पाठीशी आहेत. कार्यकर्त्यांना मोठ करण, त्यांचा सन्मान करण माझ कर्त्यव्य आहे. पक्षालाही माझी भूमिका स्वीकारावी लागेल. बीडमध्ये नको कोणी फुसके, आता फक्त राजेंद्र मस्केच माझी भूमिका स्पष्ट आहे. त्याभूमिकेशी पक्षाला सहमत करण्यासाठी मी प्रयत्न करणार, 2024 च्या विधानसभेच्या शर्यतीत राजेंद्र मस्केंसह जिल्ह्यात विजयाचा गुलाल उधळणार, अशी ग्वाही देऊन भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शुक्रवारी बीड येथे राजेंद्र मस्के मित्र मंडळ आयोजित बैलगाडा शर्यत शुभारंभ प्रसंगी सुभेच्छा दिल्या.
वंचित पीडितांना जात नसते, ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची शिकवण आचरणात आणून, वंचितांची मोट बांधून त्यांना न्याय देणार. मराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधवान नाही या संकल्पावर मी आजही ठाम आहे. समाज नाराज असताना फेटा बांधून फिरवण्याची माझी मानसिकता नाही. प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. 2024 मध्ये जिल्ह्याचा राजकीय इतिहास बदलेला असेल. हा इतिहास घडवण्यासाठी जिल्ह्यातील जनतेने खंबीरपणे पाठीशी उभे राहावे. असे आवाहन त्यांनी केले. बैलगाडा शर्यत महाराष्ट्रातील शेतकर्यांचा आवडता रांगडा खेळ आहे. राज्यात बैलगाडा शर्यतीचा कायदा तयार करण्यासाठी मी आणि पंकजाताईंनी मेहनत घेतली आहे. मराठवाड्यातील बीड येथे भव्य बैलगाडा शर्यतीच्या शुभारंभाची संधी राजेंद्र मस्केंनी दिली याचा मला आनंद आहे. पुढच्या वर्षी शर्यतीत मोठ बक्षीस चार चाकी वाहन ट्रॅक्टर ठेवा, या चार चाकी वाहनाला आम्ही सगळे मदत करून हा शर्यतीचा ट्रॅक्टर मुंबई पर्यंत घेऊन जाऊ.2024च्या रणसंग्रामात बीड जिल्ह्यातील राजकीय परिवर्तनात पंकजाताईंची भूमिका महत्वाची ठरणार आहे. ताई आणि मी राजेंद्र मस्केसाठी ताकत लाऊ असे प्रतिपादन आ. बावनकुळे यांनी केले. मागील नऊ वर्षात खा. प्रितमताई मुंडे यांनी जिल्हाभरात उत्तम कार्य केले. जनसमर्थन त्यांच्या पाठीशी असल्याने 2024 मध्ये मा. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार यात शंका नाही. राजेंद्र मस्के सांगतील ते प्रत्येक काम विकासासाठी प्रदेश अध्यक्ष म्हणून मी सरकार कडे वकिली करणार आणि राजेंद्र मस्केंना न्याय देणार. महाराष्ट्रात ना. एकनाथराव शिंदे व ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा शिवसनेचे सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र मस्के मित्र मंडळ आयोजित हौशी शेतकरी बांधवांसाठी बैलगाडा शर्यत 30 जून 2023 रोजी बीड येथील तळेगाव शिवारात या बैलगाडा शर्यतीचा शुभारंभ मा.आ.चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश भाजपा अध्यक्ष, पंकजाताई मुंडे, भाजपा राष्ट्रीय सचिव, यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी खा. डॉ. प्रितमताई मुंडे, आ.लक्ष्मण अण्णा पवार, आ. नमिताताई मुंदडा, माजी आ. भीमराव धोंडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, सर्जेराव तांदळे, प्रा. किरण पाटील, श्रीकांत दुबे, रमेशराव आडसकर, मोहनराव जगताप, अक्षय मुंदडा, नवनाथ शिराळे, डॉ. जयश्री मुंडे, शालिनी कराड, देविदास नागरगोजे, चंद्रकात फड, जगदीश गुरखुदे, अरुण राऊत आदि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या शर्यतीसाठी शेतकरी बांधवांसह प्रेक्षकांची अलोट गर्दी उसळली होती. खा. प्रितमताई मुंडे यांनी यावेळी प्रेक्षकांना संबोधित करून राजेंद्र मस्केंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोतीराव तिपाले यांनी केले तर आभार प्रदर्शन सर्जेराव तांदळे यांनी केले. बैलगाडा शर्यत 10 एकर भव्य मैदानावर संपन्न झाली. या परिसराला जत्रेचे स्वरूप आले. बीडकरांनी मनमुराद आनंद लुटला. तळेगाव शिवार माणसांनी फुलला. बीडमध्ये नको कोणी फुसके, आता फक्त राजेंद्र मस्के – पंकजाताई मुंडे असे उद्गार काढताच प्रेक्षकांनी तळ्याच्या गजरात दाद दिली.
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत
नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाहीच
आम्ही सर्व समाजाच्या प्रश्नांसाठी लढत आहोत, या समाजाला दिलेला एक एक शब्द मी पाळते, म्हणून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नसल्याचे पुन्हा एखदा पंकजाताईंनी बोलून दाखविले.
दुधही पोळल्याने आता ताकही
फुंकून प्यावं लागेल
2019 नंतर काय काय झालं, कुणी कुणी कसा कसा त्रास दिला यावर लक्षवेधत आता आपल्याला 2024 मध्ये विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, बीडमधून राजेंद्र मस्केंसारखा दुसरा कोणताच सक्षम उमेदवार नाही, त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभा राहून मी त्यांना विजयाचा गुलाल लावणार आहे. या चार पाच वर्षात आपल्याला दुधही पोळलेलं आहे त्यामुळे आता ताकही फुंकून प्यावं लागेल, असे सांगत पंकजाताईंनी 2024 च्या तयारीला लागल्याचे संकेत दिले आहेत.
यांनी जिंकली बैलगाडा शर्यत
राजेंद्र मस्के मित्र मंडळाने घेतलेली बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात संपन्न झाली, या स्पर्धेत धनगरवाडी (ता.बीड) येथील गणेश उत्तमराव फिरंगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच द्वितीय बक्षीस कु. सायली संतोष मोडक (वडकी पुणे), तृतीय बक्षीस – काशी विश्वेश्वर प्रसन्नसाई आगवणे ( अ – पुणे), चौथे बक्षीस – काशी विश्वेश्वर प्रसन्नसाई आगवणे (ब पुणे), पाचवे बक्षीस – बप्पासाहेब गोवर्धन इंदुरे – दगडी शहाजानपूर (ता. बीड) आणि सहावे बक्षीस – दादासाहेब कांता इंदुरे (दगडी शहाजानपूर ता. बीड) यांनी पटकावले आहे.















