बीड

शिवाजीनगर पोलिसांना हायकोर्टाचा दणका, बीड बसस्थानकातील हॉटेलला दिलेली नोटीस बेकायदेशीर, एपीआय दर्जाच्या अधिकार्‍याला ठोठावला 25 हजाराचा दंड, पंधरा दिवसात पगारातून हायकोर्टात जमा करावे लागणार 25 हजार


बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : रात्री दहा नंतर कॅन्टींग बंद करावी, अशी नोटीस शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. उगले यांनी बीड बसस्थानकातील हॉटेल मालकास दिली होती, त्यानंतर याप्रकरणी हॉटेल मालकाने हायकोर्टात धाव घेतली होती, याप्रकरणात पोलिसांनी थोडाही हस्तक्षेप करू नये, असे सांगत पोलिसांनी दिलेली नोटीस  बेकायदेशीर असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. विशेष याप्रकरणात ज्या पोलिस अधीकार्‍याने नोटीस बजावली होती, त्या पोलिस अधीकार्‍यास हायकोर्टाने 25 हजाराचा दंड ठोठावला आहे. त्यानुसार येत्या पंधरा दिवसात त्या अधिकार्‍याला आपल्या पगारातून 25 हजार रूपये हायकोर्टात भरावे लागणार आहेत.
छोट्या-मोठ्या घटना टळाव्यात यासाठी पोलिसांनी रात्री दहा नंतर दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बीड शहरात कारवाई सुरू असते, यातच मागच्या काही दिवसांपुर्वी रात्री दहा नंतर कॅन्टींग बंद करावी, अशी नोटीस शिवाजीनगर ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.उगले यांनी बीड बसस्थानकातील कॅन्टींगचे मालक राम बाबूराव हराळे यांना दिली होती, त्यानंतर हराळे यांनी हायकोर्टात धाव घेवून कँन्टींग रात्री आकरा ते पहाटे चारपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली होती, याप्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली, यामध्ये शिवाजीनगर पोलिसांनी थोडाही हस्तक्षेप करू नये, असे म्हणत हराळे यांना दिलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. विशेष म्हणजे हायकोर्ट एवढ्यावरच थांबले नाही तर ज्यावेळेचे लायन्सन काढलेले आहे तोपर्यंत कॅन्टींग चालू देण्याचे आदेश देत एपीआय उगले यांना 25 हजाराचा दंड ठोठावला आहे. झालेला हा दंड येत्या पंधरा दिवसात उगले यांना आपल्या पगारातून हायकोर्टात भरावा लागणार आहे. हा निर्णय न्यायाधिश रवि वि. घुगे आणि वाय.जी. खोब्रागडे यांच्या पीटाने दिला आहे. याप्रकरणी राम हराळे यांच्याकडून हायकोर्टात अ‍ॅड जर्नाधन एम.मुरकुटे यांनी बाजू लावून धरली तर त्यांना अ‍ॅड अलकेश जाधव, अ‍ॅड गोरख केंद्रे, पुजा देशमुख यांनी सहकार्य केले. दरम्यान हायकोर्टाचा हा निर्णय शिवाजीनगर पोलिसांसाठी मोठा दणकाच समजला जात आहे.  

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!