–
–
बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) गैरप्रकार प्रकरणात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने कारवाई सुरू केली आहे. बीड जिल्ह्यातील 2018-19 मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या 73 उमेदवारांची संपादणूक रद्द करण्यात आली असुन त्यांचे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा सन 2018-19 मधील प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. या संदर्भात राज्य परिक्षा परिषदेने दि.20 जुन 2023 रोजी बीडच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्यांना पत्र पाठवुन कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी याप्रकरणी कारवाई सुरू केली आहे. याच अनुषंगाने आज त्यांनी संबंधित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक आणि घोटाळेबाज शिक्षकांना सुनावणीसाठी झेडपीत बोलावले आहे. सीईओ अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या ही सुनावणी होणार आहे.
बीड जिल्ह्यातील 2018 मध्ये उत्तीर्ण झालेले 1 तर 2019 मधील 73 उमेदवार गैरप्रकार करून शिक्षक पात्र परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहे. त्या अनुषंगाने गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांविरूध्द शास्ती निश्चित करण्यात येवुन त्यांची संपादणूक रद्द करण्यात आले असुन त्यांचे टीईटी प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचे आदेश राज्य परिक्षा परिषदेने दिले आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी जिल्ह्यातील बोगस 73 शिक्षकांची सेवा समाप्त करणार आहेत. आयेशा तनुजा रफीक शेख, गोबाळे सुहासिनी बालाजी, लेंडाळ विकास अर्जून,विश्वास बालासाहेब काळे, उजमा समीन कादरी, निराले सुप्रिया अरूण, जाधव रमाबाई बालासाहेब, शिंदे कौस्तूब विजयानंद, गित्ते शिल्पा गिन्यादेव, उजमा फातेमा रफीक बेग, आर्शद रशिद सय्यद, उमेरा बानो अजिम हुसेन शेख, पुजा भास्कर मस्के, संतोष किसन आडे, पुजा धोंडीराम कांबळे, परमेश्वर बाबूराव राठोड, सीमा रंगनाथ रूदे, अजय उत्तमराव जाधव, फराह यास्मीन जहिर, फौजिया नुर उल्हासन लाहूरी, अतिया बेगम शेख मुस्ताफा, सय्यद आस्मा सय्यद मोहम्मद सिद्दीकी, सोबीया फराह सय्यद जमीरोद्दीन कादरी, बेबी हजेरी शेख साजेद, असिफीया परवीन मोहम्मद अब्दुल बासेद, निशात अरजुमन इझहार मजुरोद्दीन सय्यद, शमीका बन्सीधर रांजवन, मीन भीमराव टीके, उर्मीला अवधुतराव वादे, मुक्ताबाई नरहरी सोगे, कुलकर्णी प्रशांत दत्तात्रय, अमोल शिवाजी पाटोळे, द्रोपती वैजिनाथ सानप, सविता त्रिंबक घाडगे, देवकते सुमित्रा श्रीराम, निरडे वर्षाराणी संभाजी, मुझाहिद खलील अब्दुल हमीद मोमीन, युसूफ शेख महेमुद शेख, साझीया बेगम मोहम्मद अब्दुल सत्तार, यास्मीन बेमग सय्यद अब्दुल कादर, उमेसायमा वहाजोद्दीन अन्सारी, गणेश उध्दव वरकले, ज्योती निवृत्तीराव काळे, निशान अहेमद शेख, यास्मीन बेगम अहमद सिद्दीकी, मोहम्मद खान चाँद खान पठाण, पवार सविता सुंदरराव, कुलकर्णी प्रणिता प्रकाशराव, निलोफर नजिमोद्दीन काझी, फौजीया बेगम शरीफ खॉ पठाण, शेख हिना कौसर जमीर शेख, शाहिन बेगम बशीरोद्दीन काझी, अनवरी बेगम मुख्तार अहमद, साजिया तस्कीम मोहम्मद मुनुसोद्दीन सिद्दीकी, सय्यदा फरीन बेगम रहिमोद्दीन,खान कौसर बेगम शकील खा, सलमान मुख्तार अब्दुल, सय्यद इरफान जमील दायमी, मोईनोद्दीन चिस्ती सय्यद समीनोद्दीन, अजहर अहमद शेख, सिद्दीकी मोहम्मद मुजायोद्दीन मोहम्मद मोयीजोद्दीन, जिया अबरार शेख जफर, नुझहत फराह सय्यद जकी, सय्यद आदिल अय्युब, कसबे शैलेस काळबा, कावेरी दिलीप सानप यांचा समावेश आहे. याअनुषंगानेच उद्या सकाळी आकरा वाजता झेडपीत सुनावणी होणार आहे.
—















