बीड

झेडपीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार, विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांवर 256 शिक्षकांना सीईओ अन् ईओंनी तात्पुरत्या स्वरूपात दिली नियुक्ती, पगार मात्र पहिल्याच ठिकाणावरून निघणार


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : कमी पटसंख्या असलेल्या शाळांवरील शिक्षकांची जास्त संख्या असलेल्या शाळांवर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे. याअनुषंगानेच सीईओ अजित पवार आणि शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी शनिवारी 256 शिक्षकांचे समायोजन केले आहे. यामुळे 256 शाळांमधील विद्याथ्यार्ंचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. दरम्यान या 256 शिक्षकांचा पगार मात्र पहिल्याच ठिकाणावरून निघणार आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अशा अनेक शाळा आहेत, की त्याठिकाणची पटसंख्या वीस आणि दहाच्या खाली आहे. तर काही ठिकाणी विद्यार्थी संख्या अधिक असून त्याठिकाणी शिक्षक कमी पडत आहेत. यामुळे याठिकाणच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेवून सीईओ अजित पवार आणि ईओ श्रीकांत कुलकर्णी यांनी ठोस असे नियोजन आखले, त्यानुसार कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरील शिक्षकांना जास्त संख्या असलेल्या शाळेवर तात्परत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात आली आहे. जवळपास 256 शिक्षकांचे अशा प्रकारे समायोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातून जवळपास एक हजार शिक्षक काल झेडपीत दाखल झाले होते, रात्री नऊपर्यंत ही सगळी प्रक्रिया चालली, या 256 शिक्षकांमुळे झेडपीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. दरम्यान त्या 256 शिक्षकांचा पगार मात्र पहिल्याच शाळांवरून होणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!