बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : अवैध वाळू विक्री करणार्या माफियांविरोधात पोलीस विभागाने कारवाईची मोहिम सुरु केली आहे. गुरुवारी आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने तालुक्यातील कुर्ला परिसरातील सिंदफणा नदी पत्रात मोठी कारवाई करीत एक कोटी नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईमुळे अवैध वाळू विक्री करणार्या माफियांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली पंकज कुमावत सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग केज अतिरिक्त पदभार माजलगाव यांचे आदेशाने पथकातील पोह अतिश देशमुख, संतराम थापडे, गणेश नवले, तुकाराम कानतोडे, युवराज चव्हाण यांनी ही कारवाई केलेली आहे.















