परळी वैजनाथ दि २२ (लोकाशा न्युज) :- परळी शहरातील बरकत नगर भागात
दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत तुफान राडा झाला. हाणामारी धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला यामध्ये एक जण ठार झाल्याची खळबळजनक घटना भागात घडली आहे. संभाजीनगर पोलिसांनी वेळीच दखल घेऊन हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टाळला.
याबाबत संस्कार माहिती अशी की, शहरातील बरकत नगर भागात कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर दोन गटात हाणामारी झाली. यात एकाला जीव गमवावा लागला आहे. या घटनेबाबत अधिक चौकशी केली असता एका लग्न समारंभात हा राडा झाल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत इसम व जखमींना परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन गटांत अचानक वाद झाला हा वाद मारामारीपर्यंत पोहचला. एकमेकांवर प्रत्येकजण अक्षरश: तुटून पडले. यामध्ये एकजण ठार झाला आहे. अल्लाउद्दीन शेख रा. नागापूर असे मयत ईसमाचे नाव आहे. दरम्यान घटनास्थळी प्रचंड जमाव जमा झाला. संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळावर पोहचले असुन परिस्थिती नियंत्रणात आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.















