बीड

संतोष राऊत यांची बदली, आता शिवकुमार स्वामी बीडचे नवे आरडीसी


बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांची बदली झाली असून त्यांच्या जागी शिवकुमार स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवकुमार स्वामी हे सध्या उस्मानाबादला निवासी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. मागील अडीच वर्ष संतोष राऊत यांनी आरडीसी म्हणून उत्तम पध्दतीने काम केलेले आहे. त्यांच्या कामामुळे बीड जिल्ह्यातील अनेक गोरगरिबांना खर्‍या अर्थाने न्याय मिळालेला आहे. त्यामुळे त्यांची कारकिर्द बीड जिल्हावासियांच्या नेहमीच लक्षात राहणार आहे.

शिवकुमार स्वामी यांनी यापूर्वी अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारीपद भूषविले आहे. भीषण दुष्काळाच्या काळात ते या पदावर कार्यरत होते. त्या दरम्यान त्यांनी जलसंधारणाच्या कामात मोठे योगदान दिले होते. अंबाजोगाईतील त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली. बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या हस्ते त्यांना जिल्ह्यातील उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बीड जिल्ह्यात काम करण्याचा अनुभव असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा कार्यभार ते उत्कृष्टरित्या सांभाळतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!