बीड, दि.19 (लोकाशा न्युज) : उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून उस्मानाबाद येथील उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांची नियुक्ती केली आहे. विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना स्वतंत्रपणे नियुक्ती देण्यात येणार आहे. शासनाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्यांच्या बदल्या केल्या असून यात बीडला शिवकुमार स्वामी यांची आरडीसी म्हणून नियुक्ती झाली आहे. बीडचे आरडीसी असलेले संतोष राऊत यांची बदली प्रस्तावित असून त्यांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. दरम्यान, आता शिवकुमार स्वामी आरडीसी म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत. शिवकुमार स्वामी यांना प्रशासनातील मोठा अनुभव आहे.