शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये अंशी लाखांच्या कामाचे दोन वेळा उद्घाटन करून 80 पैशांचे देखील काम केले नाही. आमदार सोळंके व नगरसेवक लाटे आणि बनसोडे यांनी आपली घरे भरले असल्याचा आरोप करत येथील आंबेडकर चौकात बॅनर लावून त्यावर सोळंके व नगरसेवक लाटे आणि बनसोडे यांनी कुठला विकास केला हे भर चौकात पत्रकार परिषद घेवून दाखवावे असे आवाहन एम आय एम कडून बॅनर लावून करण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील 80 लाखांच्या कामाचे दोन वेळा म्हणजेच दिनांक 02.1.2022 आणि 16.7.2022 रोजी उद्घाटन करण्यात आली परंतु उद्घाटन झालेल्या एकाही कामावर छदामही खर्च करण्यात आला नाही हा सगळा निधी आमदार प्रकाश सोळंके आणि प्रभाग सात चे नगरसेवक लाटे व बनसोडे यांनी लाटून आपली घरी भरली असल्याचा आरोप ए आय एम आय एम चे शहर सचिव शेख अजीज यांनी येथील आंबेडकर चौकात बॅनर लावून केला असल्यामुळे याची एकच चर्चा माजलगाव शहरात सुरू असून या व अशा अनेक कामांमध्ये उलट सुलट चर्चांना उत आला आहे.
दिनांक 13 रोजी सकाळीच चौकात असलेले बॅनर पाहून अनेकांनी याबाबत प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली असून शहरात प्रशासक नियुक्त झाल्यापासून अनेक बोगस पद्धतीची कामे होत असल्याचे नागरिकांमधून चर्चिले जाऊ लागले आहे. त्यातच मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याबाबत देखील अनेक तक्रारी आहेत.
एम आय एम कडून भल्या पहाटेच टाकण्यात आलेल्या या बॅनर बॉम्ब मुळे शहरात नगरपालिकेकडून सुरू असलेल्या अनागोंदीला वाचा फुटत असून शहरातील अनेक ठिकाणी होत असलेल्या बोगस कामांबाबत चर्चेला ऊत आला आहे.
दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे दिनांक 17 रोजी शहरातील बँकांच्या उद्घाटनांच्या निमित्ताने येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर बॉम्ब टाकण्यात आला असल्याची चर्चा असून त्यांनाही कळावे की राष्ट्रवादीचे लोक कशा पद्धतीने वागत आहेत ही या बॅनर बॉम्ब मागची पार्श्वभूमी असल्याचे समजते.
नगरपरिषदेवर सध्या प्रशासक आहे व त्यांच्या मार्फतच प्रभाग सात मधील कामांचे निविदा प्रक्रिया होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत व काम देखील प्रशासकमार्फतच केली जात आहेत त्यामुळे आमचा कुठलाही संबंध या कामांशी नाही आम्ही कुठेही उत्तर द्यायला तयार आहोत. एम आय एम कडून होत असलेल्या बदनामीचे उत्तर त्याच पद्धतीने दिले जाईल.
-अविनाश बनसोडे,माजी नगरसेवक