बीड-बीड नगरपालिकेत कायम वादग्रस्त ठरलेल्या आणि दोन दिवसांपूर्वीच बदली झालेल्या मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. राज्य विधीमंडळ अधिवेशनात गुट्टे यांच्या निलंबनाची घोषणा करण्यात आली होती, मात्र आदेश निघाले नव्हते. अखेर बुधवारी नगरविकास विभागाने गुट्टे यांच्या निलंबनाची आदेश काढले.
बीड पालिकेत मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे याची कारकीर्द वादग्रस्त राहिली होती. गुट्टे याच्या वादग्रस्त कारकिर्दीचा फटका सामान्य नागरिकांना बसला होता. राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात सरकारने गुट्टे याला निलंबित करण्याची घोषणा केली होती. आ. विनायक मेटे यांनी हा विषय लावून धरला होता. या पार्श्वभूमीवर आज (दि.१) नगरविकास विभागाने उत्कर्ष गुट्टेच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.