बीड/राजेगाव (प्रतिनिधी)ः- भारतीय सैन्य दलातील बाराभाई तांडा राजेगाव येथील जवान भारत रामराव राठोड यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार सोमवार दि.4 रोजी मुळगावी दुपारी 1 वाजता अत्यंसंस्कर करण्यात येणार आहे.
घरची परिस्थिती हलाखीची आणि मनात देशसेवा करण्याच स्वप्न असल्याने 2012 साल्ी नागपूर येथे सैन्य दलात भरती झाले. जम्मू येथे जनरल ड्युटीवर असतांना भारत राठोड आजारी पडल्याने त्याला पुण्यातील कमांडो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतांनाच जवान भारत राठोड यांची प्राणज्योत मावळली. आज दुपारी ठीक 1 वाजता बाराभाई तांडा येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून नगर येथून आर्मीची तुकडी त्यांना मानवंदना देण्यासाठी येणार आहे. असून लोकप्रतिनिधी, लष्करी व पोलीस अधिकारी व कर्मचारी व सर्व देशप्रेमी यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार असल्याची माहीती देण्यात आली आहे.