बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) : एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग केल्याची घटना नागापुर (ता.परळी) वै.येथे समोर आली आहे.याप्रकरणी गावातीलच एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिडीत 13 वर्षीय मुलगी शेतात म्हैशीच्या वासराला चारापाणी करत असताना तिघेजण तिच्या जवळ आले. दोघेजण तिथुन निघून गेले ्व आरोपी अंकुश राम गायके (रा.नागापुर) तिथेच थांबला व त्याने अल्पवयीन असलेल्या मुलीशी तू मला आवडतीस म्हणत बळजबरीने तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. तसेच कोणास हे सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या आशयाची फिर्याद दिल्यावरुन आरोपी विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 376,(2)(जे),376(3) बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम 3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पिंक मोबाईल पथक पो.उपनि चौधर हे करीत आहेत.