गेवराई :- अवैधरित्या वाळू घेऊन निघालेल्या भरधाव ट्रँक्टरने चिरडल्याने एका जणाचा जागीच मृत्यू झाला. हि घटना गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन फाटा येथे आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास राक्षसभुवन फाट्यावर घडली आहे. दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडला होता. जोपर्यंत जिल्हाधिकारी येथे येऊन ठोस कारवाई करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी स्पष्ट नकार दिला होता. दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गेवराई येथे भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी शर्मा अवैध वाळू उपसा व वाहतूकीची चौकशी करून दोषी महसूल, पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, शिवाय मयताच्या कुटूंबाला न्याय देण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील खामगाव येथील तुकाराम निंबाळकर हे आपल्या दुचाकीवरुन (एम.एच.23 ए.ए.8126) गेवराईकडे येत असतांना अनाधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील ट्रॅक्टरने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये निंबाळकर यांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली होती. तर घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर ग्रामस्थांनी प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला.
तसेच जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत याठिकाणाहून उठणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला. जोपर्यंत ठोस कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने याठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहे. दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता बीडचे जिल्ह्यातील यांनी गेवराई येथे भेट देऊन ग्रामस्थ व काही प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी त्यांनी अवैध वाळू उपसा व वाहतूकीची सखोल चौकशी करण्यात येईल, यानंतर दोषी महसूल व पोलिस अधिकारी यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. तसेच मयतांच्या कुटूंबाला योग्य न्याय देण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला. जिल्हाधिकारी यांच्याश विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी चर्चा केली.