गेवराई:- अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवा वाळूसह ताब्यात घेऊन जवळपास 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हि कारवाई गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे महसुल पथकाने दि 14 रोजी पहाटे केली आहे.
गेवराई तालुक्यातून गेलेल्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा करुन ती चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते. राक्षसभुवन, सुरळेगाव येथे तर वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला असल्याचे वारंवार होणाऱ्या कारवाईवरुन सिध्द होत आहे.
माहिती नुसार तहसीलदार यांच्या पथकाने धाड टाकली अवैधरित्या वाळू भरुन चोरट्या मार्गाने वाहतूक करणारे दोन हायवा पकडले आहेत. दोन्ही हायवासह त्यामध्ये प्रत्येकी तीन ब्रास वाळू असा जवळपास 25 लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. कारवाई करण्यात आला हायवा येथील तहसील कार्यालयात लावण्यात आली आहेत. हि कारवाई नायब
प्रशांत जाधवर, अव्वल कारकुन नामदेव खेडकर, मंडळ अधिकारी परमेश्वर सानप, मंडळ अधिकारी जितेंद्र लेंडाळ, मंडळ अधिकारी खेडकर, तलाठी ठाकुर, सुरावार, ढाकणे, वाठोरे आदींनी केली.