बीड माजलगाव

सिंदफणा नदीत मासे पकडण्यास गेलेला इसम बुडाला

माजलगाव- शहराजवळील मनुर परिसरातील सिंदफणा पाञात मासे पकडण्यासाठी गेलेला इसम पाय घसरुन पाण्यात वाहुन गेल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता घडली.सध्या सिंदफणा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने अनेक जण मासे पकडण्याचा शोक जीव धोक्यात घालुन पुर्ण करुन घेत असून सोमवार रोजी शहरातील खाटीक गल्ली येथील मेहराज महेबुब कुरेशी (42) हे मासे गलीने पकडण्यासाठी शहराजवळील मनुर परिसरातील खडखडी नामक सिंदफणा पाञाकडे गेले होते.या वेळी अनेक जण तेथे मासे पकडत होते.माञ मेहराज याचा गल टाकतांना तोल जावून पाय घसरुन सिंदफणात पडला. धरणातुन येणाऱ्या  पाण्याचा वेग जोरात असल्याने मेहराज हा पाण्यात बुडून क्षणात वाहून गेला.यावेळी आजुबाजुच्या लोकांनी मदतीसाठी आरडा ओरड करुन शहर पोलीस,नगरपालीका कर्मचार्यांना कळविले माञ  शोध लागला नसून शोध कार्य अंधार पडल्याने थांबवून तहसिल प्रशासनाने एन.डी.आर.एफ.टिम बोलविली असल्याचे सुञाने सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!