बीड:- दगडी पुलावरून पाय घसरून पडल्यामुळे बिंदुसरा नदी मध्ये वाहून गेलेल्या 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी चार वाजता घडली.
शेख मुस्ताक शेख जावेद वय 18 वर्ष असे मृत युवकाचे नाव आहे.दाउतपूर भागात रहात असलेला हा तरुण दगडी पुलावरून जात असताना अचानक पाय घसरून बिंदुसरा नदी पात्रात पडला. सध्या पाण्याचा प्रवाह वेगात असल्यामुळे मोंढा रोड पूलाखाली त्याचा मृतदेह काही जणांना आढळून आला या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत युवकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.