बीड:- न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांनी अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मंगळवारी (दि.21) त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. त्यांना जामीन मिळाल्यानंतर जेलमधून हसत बाहेर पडल्यावर आणि नो कमेंट्स म्हणत माध्यमांशी बोलण्याचे करुणा शर्मा यांनी टाळले आणि गाडीत बसून निघून गेल्या. यावेळी त्यांच्या वेलकमसाठी वाल्मीक कराड यांच्यासह अन्य धनंजय मुंडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

