बीड

दोन गुंडांना पोलीस अधीक्षकांनी एमपीडीए कायद्यांतर्गत केले स्थानबध्द


बीड, जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाटी बीड जिल्हा पोलीस दलाकडून आटोकाट प्रयत्न चालू आहेत . याचाच भाग म्हणून बीड जिल्हयातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारावर पोलीसांची करडी नजर आहे . गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोण डोळयासमोर ठेवून दृष्टीक्षेपात असणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द कडक कायदेशीर कार्यवाही करुन सार्वजनिक सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दल कामाला लागले आहे . मालाविरुध्दचे व शरीराविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे गुन्हेगार आणि गुन्हे केल्यानंतर शेजारच्या जिल्हयाचा आश्रय घेवून अटक टाळण्यासाठी स्वत : चे अस्तीत्व लपवून वावरणारे गुन्हेगार यांचेवर आगामी गणेशोत्सव , दूर्गाउत्सव सण , उत्सव संबंधाने पोलीसांचा डोळा होता , अंबाजोगाई शहरात सन -2013 ते सन -2021 दरम्यान इसम नामे उमेश दत्तात्रय पोखरकर वय 28 वर्षे रा.नागझरी परिसर , अंबाजोगाई याचेविरुध्द पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर , केज येथे सरकारी नोकरावर हल्ला करणे , दंगा करणे , रस्ता अडविणे , मारहाण करणे , जिवे मारण्याच्या धमक्या देणे . शिवीगाळ करणे , पळवून नेणे , जबरी चोरी करणे अशा गंभीर स्वरुपाचे बरेच गुन्हे दाखल असून त्यापैकी ( 04 ) गुन्हे अभिलेखावर आहेत . त्यावरुन वरिष्ठांच्या सुचनेवरुन पोलीस निरीक्षक , पो.स्टे.अंबाजोगाई शहर यांनी सदर इसमांविरुध्द MPDA कायद्यान्वये प्रस्ताव तयार करुन दिनांक 18/06/2021 रोजी मा.पोलीस अधीक्षक , बीड यांचे मार्फतीने मा.जिल्हादंडाधिकारी , बीड यांना सादर केला होता . तसेच केज शहरात व तालुक्यात इसम नामे बबन कल्याण पवार वय 30 वर्षे रा.कोरेगांव ता.केज जि.बीड याची दहशत होती . त्याचेविरुध्द सन -2015 ते सन -2021 दरम्यान विनाकारण मारहाण करणे , दहशत पसरविणे , घरफोडी करणे , दुखापत करणे , शिवीगाळ करणे , दरोडा घालणे , चोरी करणे , रस्ता अडविणे असे व इतर गंभीर स्वरुपाचे ( 06 ) गुन्हे दाखल आहेत , त्यावरुन वरिष्ठांच्या सुचनेवरुन पोलीस निरीक्षक , पो.स्टे.केज यांनी सदर इसमांविरुध्द MPDA कायद्यान्वये प्रस्ताव तयार करुन दिनांक 05/04/2021 रोजी मा.पोलीस अधीक्षक , बीड यांचे मार्फतीने मा . जिल्हादंडाधिकारी , बीड यांना सादर केला होता . सदर प्रस्तावाचे मा.जिल्हादंडाधिकारी , बीड यांनी अवलोकन करुन दिनांक 08/09/2021 रोजी उपरोक्त दोन्ही इसमांना ताब्यात घेवून हर्सल कारागृह , औरंगाबाद येथे स्थानबध्द करणे बाबतचे आदेश पारीत केल्याने वरील दोन्ही इसमांना दिनांक 08/09/2021 रोजी ताब्यात घेवून दिनांक 09/09/2021 रोजी हसूल कारागृह , औरंगाबाद येथे हजर करुन स्थानबध्द करण्यात आले आहे . सदरची कामगिरी वरिष्टांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर , केज व स्थानिक गुन्हे शाखा , बीड येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!