भारतात प्रतीमिनीट बलात्कार अत्याचार व विनयभंगाच्या असंख्य घटना घडत आहेत , दिल्ली देशाची राजधानी आहे का बलात्काराची असाच प्रश्न निर्माण करणारी एक घटना समोर आलेली आहे . दिल्ली येथील महिला पोलीस कर्मचारी राबिया हिची हत्या अत्यंत निर्दयी पने करण्यात आली . अंगावर प्रचंड वार करून तिला ठार करण्यात आले , निजामुदिन नामक व्यक्तीने संशयातून हत्या केल्याचे म्हटले आहे . सदरील व्यक्ती सोबत राबियाचे प्रेम संबंद असल्याचे बोलले जात असले तरी राबियाच्या कुटुंबाने यावर नकार देताना हत्या सामुहिक अत्याचार करून केल्याचा आरोप केला आहे .
दिल्ली महिला आयोगाने दिल्लीच्या नागरी संरक्षण स्वयंसेवकाच्या फरीदाबादमध्ये झालेल्या हत्येच्या मीडियाच्या अहवालांवर स्वत: ची दखल घेतली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पीडितेला दक्षिण पूर्व जिल्ह्यातील डीएम कार्यालयात तैनात करण्यात आले होते. रिपोर्टनुसार, महिला २७/०८/२०२१ पासून बेपत्ता होती आणि तिचा मृतदेह ३०/०८/२०२१ रोजी सूरजकुंड, फरिदाबाद येथून विकृत अवस्थेत सापडला होता. आयोगाने पीडितेच्या कुटुंबाशी बोलले असून त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. ही एक अतिशय गंभीर बाब आहे आणि दिल्ली महिला आयोगाने यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. सदरील घटनेवर माध्यम का गप्प बसली आहेत असा देखील आवाज समोर येत असून , निर्भया प्रकरणापेक्षा अधिक निर्दयी पणे कौर्य यात असताना यावर कुणी चर्चा करत नसल्याचे समोर आलेले आहे . त्यामुळे राबिया सारख्या आणखी किती बहिणी नराधमांच्या बळी ठरणार आहेत असा सवाल समोर येत आहे .
१ . प्रकरणामध्ये नोंदवलेल्या FIR ची प्रत.
२ . या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा तपशील. ३ . मृताच्या पोस्टमॉर्टम अहवालाची प्रत.
४ लैंगिक अत्याचाराचे विभाग जोडले गेले आहेत का? नसल्यास, कृपया त्याची कारणे द्या.
५ . प्रकरणाचा सविस्तर कारवाई अहवाल.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, कृपया ०६/०९/२०२१ पर्यंत आयोगाला मागितलेली माहिती प्रदान करा. चार महिन्यांपूर्वी दिल्ली डिफेन्स पोलिसमध्ये निवड होऊन नोकरी करीत असलेल्या पोलीस वर्दीत बघतांना तिच्या पालकांना झालेला आनंद आज दुःखांत बदलली.. कल्पना करा की मुलीला पोलीस अधिकारी म्हणून सुरक्षित नोकरी मिळाली आहे आणि मग अशा प्रकारच्या घटनेला आई वडिलांना सामोरे जावे लागेल की तिच्याच सहकाऱ्यांमार्फत बलात्कार आणि शरीराचे अवयव कापून पन्नास वार झेलून झालेली हत्या..आणि या क्रूरतेवर सगळी प्रसार माध्यमं शांत का आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे .