अंमळनेर ( लोकाशा न्युज ) अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील सावरगाव परिसरात गुरुवारी जमिनीत पुरलेले अर्भक मृतावस्थेत बाहेर आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी अंमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे ,सहाय्यक फौजदार आप्पासाहेब सानप यांनी धाव घेतली होती सदरील मृतावस्थेत सापडलेले अर्भक हे पुरुष जातिचे असुन ते न ऊ महिण्याचे होते अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहितकुमार कागदे यांनी दिली. अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या सावरगाव येथे जमिनीत पुरलेले 9 महिण्याचे पुरुष जातिचे अर्भक मृतावस्थेत आढळून आलेले असल्यामुळे एकच खळबळ उडाली होती त्या वैरणी मातेचा शोध घेण्याची शोध मोहीम देखील राबविण्यात आली आहे. अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीत सापडलेले मृतावस्थेत अर्भक हे पुरुष जातिचे न ऊ महिण्याचे आहे ? सदरील अर्भकाला कोणी फेकून दिले कि मारुन फेकून दिले ?अर्भक फेकून देणारी हि माता वैरणी कोण याचा शोध घेण्याचे काम हे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख एपीआय शामकुमार डोंगरे यांनी सुरु केलेले आहे.
—चौकट सावरगाव परिसरात अर्भक मृतावस्थेत सापडले असुन सदरील अर्भकाला फेकून देणारी माता कोण ? याचा शोध घेण्याची शोध मोहीम सुरु करण्यात आलेली असल्याची माहिती अंमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी दिली. —चौकट सावरगाव येथे मृतावस्थेत मिळून आलेले अर्भक हे न ऊ महिण्याचे पुरुष जातिचे असुन त्याचे पीएम हे जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहितकुमार कागदे यांनी केले.ReplyForward