बीड

‘ कामापुरता ‘ ठेवलेल्या प्रियकराची प्रियसीने केली हत्त्या ? धारुर तालुक्यातील करेवाडी येथील प्रकार,मयताच्या नातेवाईकांची पोलिस स्टेशनमध्ये धाव,घटना घडून झाले ८ दिवस

सिरसाळा न्यूज : प्रेमाच्या नावा खाली अनैतिक संबंधात ‘कामापुरता ‘ठेवलेल्या प्रियकराची प्रियशीने हत्त्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. हा प्रकार सिरसाळा नजीक च्या धारुर तालुक्यातील करेवाडी येथे घडल्याचे समजते आहे. या विषयी सविस्तर वृत्त असे कि, करेवाडी ता.धारुर येथील युवक बाळासाहेब सुखदेव कावळे वय ३० वर्षे, हा दिनांक २१ वार शनिवार रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान मृत अवस्थेत संशयीत महिलेच्या घरा पाठी मागे आढळून आला. बाळासाहेब यास कान्नापुर, सिरसाळा येथील खासगी दवाखान्यात दाखवले तेव्हा अधिकृत समजले कि,बाळासाहेब कावळे चा मृत्यू झाला आहे.नातेवाईक भाऊ व इतर याना वाटले कि, बाळासाहेब चा मृत्यू नैसर्गिक झाला आहे. पंरतु गावातून समजले कि,ज्या महिलेशी बाळासाहेब चे अनैतिक संबध होते त्या संशयीत महिलेच्या घरातून रात्री बाळासाहेब यास मृत अवस्थेत एका महिले सह इतर तीन जणांनी बाहेर आणून टाकले असल्याचे जबाबात म्हंटले आहे. समजलेल्या गंभीर माहिती वरुन मयताचे नातेवाईक खडबडून जागे झाले. घटना घडल्या च्या तीन चार दिवसां नंतर सिरसाळा पोलिस स्टेशन येथे धाव घेतली. दरम्यान मयत बाळासाहेब चा अंत्यविधी झाला आहे. मयताचा भाऊ अरुण कावळे याने दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटंले आहे कि, गावातील एका महिले सोबत बाळासाहेब कावळे याचे अनैतिक संबंध होते. घटनेच्या दिवशी रात्री १० वाजता च्या दरम्यान अरुणा कावळे नामक महिलेने संबंधित संशयीत महिलेच्या घरा समोर एका महिलेसह अन्य तिघे जणांनी बाळासाहेब यास उचलेन टाकले असल्याचे जबाबात म्हंटले. या वरुन गावात खून झाल्याची चर्चा आहे. बाळासाहेब ह्या युवकाचे संबंधित संशयीत महिलेशी अनैतिक संबंध होते आणि हि महिला बाळासाहेब याचा काटा काढणार होती असे बोलल्या जात आहे. इतर प्रियकरांच्या मदतीने बाळासाहेब चा घात केला असल्याचे बोलल्या जात आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलिस स्टेशन येथे मयताचा भाऊ अरूण कावळे याने लेखी तक्रार देऊन भाऊ बाळासाहेब चा खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे व घडला प्रकार सविस्तर तक्रारी अर्जात नमूद केलेला आहे. सिरसाळा पोलिस स्टेशन येथे अद्याप ह्या प्रकरणी गुन्हा दाखल नाही.किंवा रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल नव्हता.

●: पोलिसां समोर मोठे आव्हान :
घटना घडून आठ दिवस होत असतांना मयताचे नातेवाईक घात पात झाल्याचा संशय व्यक्त करत आहेत.नातेवाईकांनी बाळासाहेब चा मृत्यू नैसर्गिक समजून धार्मीक पद्धतीने अंत्यवीधी उरकून घेतला आहे. राख सावडून गंगेत अस्थी विसर्जीत केले असल्याचे समजते आहे. एकीकडे खून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय पंरतु मयताचा अंत्यसंस्कार झाले असल्याने या प्रकरणाचा तपास कसा करावा ? याचे आव्हान सिरसाळा पोलिसां पुढे आहे.

● मयताच्या भावाला ‘मेनका’च्या शुभचिंतकांचा दबाव :
गावात ‘मेनका ‘म्हणून प्रसिद्ध असलेली संशीयीत महिलेचे ‘शुभचिंतक ‘ मेनकाच्या बचावा साठी मयताचा भाऊ अरुण कावळे यावर दबाव आणून पोलिस स्टेशन मधील तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत असल्याचे ग्रामस्थां मध्ये बोलल्या जात आहे. या प्रकरणी पोलिस अधिक्षकांनी लक्ष घालायला हवे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!