बीड

नेता असावा तर तो भैय्यांसारखा ! अशोक रोमन यांनी आठरा वर्षातील सोबतीच्या आठवणींना दिला उजाळा


राजकारणात शब्द तर सर्वच नेते देत असतात, मात्र दिलेले शब्द पुर्ण करणाराच खरा नेता असतो, असाच सच्चा आणि सर्वांना साथ देणारा नेता बीड जिल्ह्याला, बीड मतदार संघाला आ. संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. संकट छोटं असो की मोठं भैय्या तात्काळ मदतीला धावून येवून आम्हाला आपुलकीने आधार देतात, त्यामुळेच नेता असावा तर तो भैय्यांसारखा, असे सांगत आखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक रोमन यांनी त्यांच्या आणि आ. संदिप भैय्यांच्या सोबतीच्या आठरा वर्षातील आठवणींना उजाळा दिला आहे.
मागच्या आठरा वर्षांपासून मी संदिप भैय्यांसोबत आहे. त्यांचे काम मी अगदी जवळून पाहिलेले आहे. पुर्वी छोट्याश्या लघू उद्योगात काम करत असताना माझी आणि भैय्यांची ओळख झाली. यादरम्यानच आम्हा दोघांची वैचारिक नाळ जुळली, आज माझे काम बीड नव्हे ते तर संपूर्ण मराठवाड्यात सुरू ते फक्त आणि फक्त भैय्यामुळेच. भैय्यांचे कार्य पाहूणच आम्ही राजकारणात उतरलो, भैय्यांनी कधीच जात पात पाहत नाहीत, प्रत्येकाला न्याय देणे हेच त्यांचे ध्येय आहे. त्यामुळेच आम्ही आज सर्व कार्यकर्ते भैय्यांचा रथ ओढण्याचे काम करत आहोत. रात्री बे रात्री ते धावून येतात, दोन वाजताही ते फोन उचलतात. यातून कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे प्रश्‍न अवघ्या सेंकदात मार्गी लागतात. भैय्यांच्या याच नेतृत्व गुणामुळे आज त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र आपुलकीने पाहत आहे. भैय्यांना प्रत्येकाची काळजी वाटते, ते प्रत्येकाच्या संकटात धावून जातात. मग यावेळी निर्माण झालेला  प्रश्‍न छोटा असो की मोठा..बीड शहराबरोबरच बीड मतदार संघातील नागरिकांसमोर ज्या ज्यावेळी संकटे उभी राहिली त्या त्यावेळी भैय्या त्यांच्या मदतीला धावून जातात आणि त्यांच्या अडचणी सोडवितात. पडत्या काळातही भैय्या कधीच मागे हटले नाहीत, मागचा पुढचा कोणताच विचार न करता त्यांनी लोकांना थेट आधार देण्याचे, त्यांची थेट मदत करण्याचे काम केले. आणि आताही ते करतच आहेत. मागच्या दोन वर्षापासून कोरोनाने संपूर्ण बीड जिल्ह्याला घेरलेले आहे. या भयाणक अशा संकटात घरातून बाहेर कोणी निघाले नाही. मात्र आमदार म्हणून नाही, तर एक जबाबदारी म्हणून आ.संदिपभैय्या भितीने घरात न बसता  त्यांनी बीडमधील सर्व कोविड वार्डाला भेटी दिल्या आणि प्रत्येक वार्डामध्ये जाऊन अतिदक्षता कक्षामध्येही संदिपभैय्या सर्वांना धीर देण्यासाठी गेले. त्यांनी खचलेल्या मनाला आधार दिला, ज्यावेळी बीडमध्ये ऑक्सीजनचा तुटवडा झाला तेंव्हा रात्री बारा, एक वाजता स्वत: प्लॅन्टवर जाऊन बाहेर जाणार्‍या गाड्या त्यांनी स्वत: अडवून बीड हॉस्पीटलला आणल्या हे कोणी शिकवून होत नाही तर ती मुत्सद्देगिरी रक्तातच असावी लागते आणि ती आ.संदिपभैय्यांमध्ये दिसून येते. त्यांना आमदार होवून दोन वर्ष झाली, एवढ्या कमी वेळेत भैय्यांनी बीड शहर आणि बीड मतदार संघातील विकास कामांना खर्‍या अर्थाने गती देण्याचे काम केले. भैय्यांच्या नेतृत्वात विकासाचा महायज्ञ नक्कीच यशस्वीतेचा शिखर सर केल्याशिवाय राहणार नाही. पवार साहेबांचे लाडके आमदार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. गेल्या काही दिवसात पवार साहेबांबरोबर दिल्ली वारीही त्यांनी केली आहे आणि त्यामधून बीडच्या विकासाला चालना मिळाली आहे. जसे नेतृत्व बीड शहराला, बीड मतदार संघाला मिळायला हवे होते ते भैय्यांच्या माध्यमातून मिळाले आहे. भैय्या कार्यकर्त्यांचा प्राणच आहेत. कारण कार्यकर्त्यांना ते आपले कुटूंबच समजतात आणि त्याप्रमाणे ते कार्यकर्त्यांना मदतही करतात. त्यामुळेच नेता असावा तर तो भैय्यांसारखा असे सांगत छावाचे जिल्हाध्यक्ष अशोक रोमन यांनी आठरा वर्षातील सोबतीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मराठा आरक्षण, अटक आणि भैय्यांनी केलेली
सुटका आम्ही कधीच विसरू शकत नाही
ज्या ज्यावेळी मराठा समाजाचा विषय आला त्या त्यावेळी आ. संदिप भैय्या आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, ते आमच्यासोबत लढले.. वास्तविकता त्यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर आम्हाला अटक झाली होती, यावेळी भैय्यांची आमची सुटका केली, हा क्षण मी कधीच विसरू शकत नसल्याचेही रोमण यांनी म्हटले आहे.

रूग्ण सेवेसाठी बोलून नव्हे तर
भैय्यांनी प्रत्यक्ष करून दाखविले
रूग्ण सेवा काय असते आणि ती कशी करावी लागते हे संदीप भैय्यांनी प्रत्यक्ष करून दाखविले. त्यांनी बीडमध्ये उभा केलेल्या काकू नाना हॉस्पीटलचा आज बीड जिल्ह्याला मोठा फायदा होत आहे. याच बरोबर मागच्या दोन वर्षात कोविडमध्ये त्यांनी केलेले काम खर्‍या अर्थाने विरोधकांना तोंडावर अपटणारेच असल्याचेही रोमण यांनी यावेळी म्हटले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!