बीड

​’या’ लोकांना डास जास्त चावतात, जाणून घ्या नेमकं कारण…

तुम्ही अनेकदा नोटीस केलं असेल की, काही ठराविक लोकांना जास्त डास चावतात. यामागे वैज्ञानिक कारण आहे. डास चावणं तुमच्या रक्ताचा प्रकार, मेटाबॉलिक रेट, त्वचेतील जीवाणू आणि तुम्ही घातलेले कपडे, यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतात.

घामामुळे- डासांना घाम आणि लॅक्टिक अॅसिड आवडतात, त्यामुळे जास्त घाम आलेल्या लोकांना डास चावतात. म्हणून, जास्त घाम आल्यानंतर आंघोळ करा.

मेटाबॉलिक रेट- मेटाबॉलिक रेट आपल्या शरीरातून सोडल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण ठरवतं असतो. त्याचा तीव्र वास डासांना आकर्षित करतो. विशेषतः मादी डास हा वास जास्त लवकर ओळखू शकतात.

गरोदर महिला-एक अभ्यासानुसार, गरोदर महिला इतर व्यक्तींपेक्षा तुलनेनं जास्त कार्बन डायऑक्साइड रिलीज करतात. त्यामुळे गरोदर महिलांना डास जास्त चावतात.

त्वचेतील जीवाणू – त्वचेमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू असतात. कधीकधी डास त्याकडेही आकर्षित होतात आणि तुम्हाला चावतात. याचे कारण ठराविक प्रकारचे जीवाणू आहेत, जे डासांना आकर्षित करतात.

रक्ताचा प्रकार- O रक्तगट असलेल्या लोकांकडेही डास अधिक आकर्षित होतात. या व्यतिरिक्त, A रक्तगट असलेल्या लोकांकडेही डास काही प्रमाणात आकर्षित होतात.

अल्कोहोलचं सेवन- एका अभ्यासानुसार, जे लोक जास्त मद्यपान करतात, त्यांच्याकडे डास आकर्षित होतात. त्यामुळे एकतर दारुचं व्यसन कमी करा किंवा डासांपासून बचाव करण्याची व्यवस्था करा.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!