बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यतील गुन्हेगारांना पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी चांगलाच दणका दिला आहे. आठ प्रकरणातील 22 गुन्हेगारांना एसपींनी हद्दपार केले आहे, एसपींच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हयातील सन 2021 मध्ये वेगवेगळया पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शरीराविरुध्द , माला विरुध्द चे गुन्हे करणारे टोळया मधील इसमाविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 55 अन्वये हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या अधिकारामध्ये सदर प्रकरणात सुणावनी घेऊन इसमांची टोळी ही गुन्हे करण्याचे सवईचे असल्याने , त्यांची गावात , तालुक्यात दहशत असल्यामुळे व त्यांच्या गैरकृत्या मुळे कायदा व सुव्यस्थेस बाधा निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी गेल्या आठवडया मध्ये वेगवेगळया तालुक्यातुन 22 इसमांना हद्दपार केले आहे . 1.पोलीस ठाणे धारुर हद्दीतील इसम नामे 1 भास्कर ज्ञानोबा कुँदे 2. विलास ज्ञानोबा कुँदे 3. श्रीकांत प्रभाकर फंदे सर्व रा . उमराई ता.अंबाजोगाई यांना धारुर , केज , वडवणी , अंबाजोगाई , या तालुक्यातुन हद्दपार केले आहे . 2. पोलीस ठाणे अंमळनेर हद्दीतील राहाणारे इसम नामे 1.आबा मल्हारी सुळ 2.दादासाहेब आबा सुळ 3.बालासाहेब बबन सुळ सर्व रा . खोपटी ता . शिरुर यांना शिरुर , आष्टी , पाटोदा या तालुक्यातुन हद्दपार केले आहे . तसेच इसम नामे ।संतोष गोरख खोटे 2.संजय गोरख खोटे 3.गोरख जीबक खोटे सर्व रा . मुगगाव ता.पाटोदा , व इसम नामे 1.ज्ञानदेव साहेबराव खोटे 2.बापुराव साहेबराव खोटे 3.सुधाकर साहेबराव खोटे 4.युवराज ज्ञानदेव खोटे सर्व रा . मुगगाव ता . पाटोदा यांना पाटोदा , आष्टी , शिरुर तालुक्यातुन हद्दपार केले आहे . 3. पोलीस ठाणे चकलांबा हद्दीत राहाणारे 1 जालींदर सर्जेराव येवले 2.विशाल जालींदर येवले दोन्ही रा . पाथरवाला खु . ता गेवराई यांना गेवराई तालुक्यातुन हद्दपार केले आहे . 4.पोलीस ठाणे बर्दापुर हद्दीतील इमस नामे 1. सिध्देश्वर बालाजी दराडे 2.महादेव बालाजी दराडे दोन्ही रा . दरडवाडी ता . अंबाजोगाई यांना अंबाजोगाई तालुक्यातुन हद्दपार केले आहे . 5. पोलीस ठाणे पिंपळनेर हद्दीतील इसम नामे 1.हरिदास मनोहर जगताप 2.प्रताप हरिदास जगताप 3 . अमोल हरिदास जगताप सर्व रा . भवानवाडी ता . बीड यांना बीड व वडवणी तालुक्यातुन हद्दपार केले आहे . 6.पोलीस ठाणे गेवराई हद्दीतील इसम नामे 1.संतोष हनुमान धनगर रा . गोपाळवस्ती बेलगाव ता . गेवराई 2.भागवत सखाराम पवार रा . नागझरी ता . गेवराई यांना हद्दपार केले आहे . सदर 22 इसमांना हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी वेगवेगळया तालुक्यातुन हद्दपार केले आहे.