बीड, दि.14 (लोकाशा न्यूज):- धारूर तालुक्यातील गावंदरा येथील नावलौकिक असलेल्या सुधाकर वसंत राठोड (वय-45 वर्षे) यांचे दीर्घ आजाराने शनिवारी दि.14 ऑगस्ट रोजी पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले.
प्रत्येक माणसास मृत्यू हे अंतिम सत्य आहे. मात्र ऐन तारुण्यात व उमेदीच्या काळात अकाली मृत्यु येणे ही फार दुःखदायक व मनाला चटका लावून जाणारी अशी घटना आहे. हलाकीच्या जीवनातून आपले अस्तित्व निर्माण करत तालुक्यामध्ये नावलौकिक केले. परंतु नियतीने आणि शरीराने दगा दिल्याने दीर्घ आजार जडले. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजाराशी संघर्ष चालू असताना शनिवारी दि.14 ऑगस्ट 2021 रोजी पुणे येथील रुग्णालयात प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर रविवारी दि.15 ऑगस्ट रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. घरातील कर्ता पुरुष गेल्याने राठोड कुटूंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांच्या दुःखात लोकाशा परिवार सहभागी आहे.