बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : माणूसकीला काळीमा फासेल अशी घटना जिल्ह्यातील कडा येथे उघडकीस आली आहे. या घटनेतील सदर पीडिता ही 5 महिन्याची गरोदर असून सासू आणि नवरा यांनी पीडितेला वंशाचा दिवा पाहिजे म्हणून तिच्या इच्छे विरुद्ध आरोपी देवा विष्णु यादव याच्याशी तिला संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले, त्यातून ती गरोदर राहिली तर तिला कोणी सध्या स्विकारायला तयार नाही, मुलाला नाव कोणाचे देणार इतकी गंभीर परिस्थिती असताना सदर घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला परंतु आरोपीला अद्याप अटक का नाही करण्यात आले असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षा अॅड संगिता धसे यांनी उपस्थित केला आहे. जर लवकरात लवकर आरोपीला अटक नाही केले तर भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असे अॅड धसे यांनी म्हटले आहे.