नेकनूर – दि १० वार्ताहार
नेकनूर येथील २५ वर्षीय महिला घरामध्ये झोपली असता एका आरोपीने घरात घुसून सदरील महिलेच्या पतीस व मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला . या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात नराधम आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील आरोपी फरार झाला आहे . गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये महिला – मुलींवरील अन्याय अत्याचारात वाढ झाली आहे .
नेकनूर येथील २५ वर्षीय महिला रात्री घरामध्ये झोपली असता अविनाश लक्ष्मण पारसे ( रा . झोपडपट्टी नेकनूर ) हा घरामध्ये घुसला . त्याने महिलेच्या पतीला व मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला . सदरील हा प्रकार महिलेने आपल्या घरच्या लोकांना सांगितल्यानंतर या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली . त्यानुसार आरोपी अविनाश पारसे याच्या विरोधात कलम ३७६ , ४५२ , ५०६ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पिंक पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कोळी मॅडम या करत आहेत .