बीड

खा. संजय जाधव यांनी तोंड सांभाळून बोलावे अन्यथा समता सैनिक त्याचं तोंड फोडतील – ॲड.सुभाष राऊत यांचा इशारा


बीड / प्रतिनिधी
खा. संजय जाधव याने तोंड सांभाळून भाषण करावे अन्यथा समता सैनिक त्याचं तोंड फोडल्याशिवाय राहणार नाहीत असा सज्जड इशारा समता परिषदेचे विभागीय तथा बीड जिल्हा अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांनी दिला आहे.
जालना येथे आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा मेळाव्यात बोलताना खा. संजय जाधव याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मनसोक्त तोंडसुख घेत असताना राज्याचे मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ना. छगनरावजी भुजबळ साहेबांबद्दल अपशब्द वापरून जी चूक केली आहे, त्या चुकीची जाहीर माफी मागावी. बापा समान असलेल्या साहेबांबद्दल अपशब्द वापरण्याची ज्याची लायकी नाही अशा बिनबापाच्या खा. संजय जाधव यांनी जाहीर माफी मागितली नाही तर समता सैनिक महाराष्ट्रात दिसेल तेथे त्याचे तोंड फोडल्या शिवाय राहणार नाहीत असा सज्जड इशारा समता परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांनी दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!