बीड, दि.8:- मराठवाड्यामध्ये एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असताना बीड जिल्ह्यामध्ये मात्र दुसरी लाट अजूनही कायम आहे. रोज दोनशेच्या पुढे रूग्णसंख्या सापडत असताना आता मृत्युचा आकडाही वाढू लागला आहे. शनिवारी तब्बल सहा कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्युचा हा आकडा नक्कीच चिंताजनक आहे. दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये रविवारी 216 कोरोनाचे नवे बाधित रूग्ण सापडले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये शनिवारी कोरोनाबाधितांच्या आकड्याने दोनशे पार केले. 216 कोरोनाचे नवे रूग्ण सापडले. यात अंबाजोगाई 9, आष्टी 70, बीड 31, गेवराई 18, केज 12, माजलगाव 31, परळी 3, धारूर 3, पाटोदा 21, शिरूर 9, वडवणी 9 अशी रूग्णसंख्या आहे. दिवसभरामध्ये 157 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर चिंताजनक बाब म्हणजे उपचार घेताना सहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यात रविवारचा मृत्युचा आकडा सर्वात मोठा आहे.