बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : गढी परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती एसपींच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी त्या ठिकाणी धाड याकली असता तिर्रट नावाचा जुगार खेळताना 13 जुगारी पोलिसांनी पकडून त्यांच्याविरोधात गेवराई पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या वेळी पोलिसांनी 2 लाख 4 हजार 670 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. त्यांच्या या कारवाईमुळे जुगार्यांचे धाबे दणाणले आहेत.
गढीपासून जवळ असलेल्या निपाणी जवळका रोडवर हॉटेल शुभमच्या पाठिमागे पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती एसपींचे विशेष पथक प्रमुख ए.पी.आय. विलास हजारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह सोमवारी त्या ठिकाणी धाड टाकली. या वेळी तिर्रट नावाचा जुगार खेळताना जुगारी नवनाथ प्रभाकर बारगजे (रा. वडगाव), समीर महंमद सय्यद (रा. वडगाव), कर्नयाल विठ्ठल यादव (रा. बुर्हानपूर), बाबासाहेब चंद्रभान माने (रा. निपाणीजवळका), अशोक सुदाम माने (रा. निपाणीजवळका), प्रदीप शहादेव ढाकणे (रा. वडगाव), सुधाकर अंकुश काकडे (रा. निपाणी जवळका), गणेश साहेबराव गायकवाड (रा. गढी), विठ्ठल जीवन चौधरी (रा. निपाणीजवळका), भाऊसाहेब श्रीराम राठोड (रा. निपाणीजवळका), सुभाष तुकाराम ढाकणे (रा.मिरकाळा), सर्जेराव बाजीराव झिटे (रा. कुंभारवाडी), काकडे शिवप्रसाद भगवान (रा. निपाणीजवळका) हे तेरा जुगारी त्या ठिकाणी जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून तिर्रट जुगाराच्या साहित्यासह नगदी 42 हजार 170 रुपये, मोबाईल, दुचाकी असा एकूण 2 लाख 4 हजार 670 रुपयांचा ऐवज जप्त केला.