बीड

चि. कौस्तुभ प्रदीप कुलकर्णीचे 12 वी परिक्षेत 94 टक्के गुण मिळवत घवघवीत यश

परळी दि. ०३ —– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १२ वी (विज्ञान शाखा) च्या परिक्षेत कौस्तुभ प्रदीप कुलकर्णी याने ९४.१६ टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले.

बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पध्दतीने जाहीर झाला. या परिक्षेत कौस्तुभ कुलकर्णी याने ६०० पैकी ५६५ गुण (९४.१६ टक्के) घेऊन त्याने हे यश संपादन केले. कौस्तुभ हा अतिशय अभ्यासू व शिक्षणात मेहनतीची त्याची तयारी लहानपणापासूनच दिसून येते. या याशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!