बीड

जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांचा अतिरिक्त पदभार डॉ. शेख रौफ यांच्याकडे


बीड, दि. 2 (लोकाशा न्यूज) : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांची सातरा येथे बदली झाली आहे. त्यामुळे अद्याप त्यांच्या जाग्यावर नविन अधिकार्‍याला नियुक्ती देण्यात आलेली नाही, सध्या हे पद रिक्त आहे. त्यामुळे बीड जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेख रौफ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यानुसार डॉ. शेख रौफ यांनीही आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे. दरम्यान डॉ. पवार यांनीही सातरा येथे जावून आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे. कोरोनाच्या कठीण काळात पवार यांनी अत्यंत चांगल्या पध्दतीने काम करून जिल्हावासियांना सेवा दिली होती. अगदी त्यांच्याप्रमाणेच डॉ. शेख रौफ हेही आपले कर्तव्य बजावतील असा विश्‍वास जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून व्यक्त केला जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!