कडा -तालुक्यातील धानोरा येथे हिवरा रस्त्यावर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दोन दूचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघेही दूचाकीचालकांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. आष्टी तालुक्यातील धानोरा- हिवरा रस्त्यालगत असलेल्या धोंडे महाविद्यालयाच्या परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात सुलेमान देवळा येथील एकनाथ घोडके व संगीता घोडके हे पती-पत्नी ( MH-14- Y- 6252) असा क्रमांक असलेल्या दुचाकीवरून धानो-याकडे येत होते. याच दरम्यान समोरुन येणा-या (MH-12- QP -4359) क्रमांक असलेल्या पल्सरची जोरदार धडक बसली. या दुचाकींच्या भीषण अपघातात एकनाथ घोडके व गणेश भोसले या दोन्हीही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला तर संगिता घोडके ही महिला गंभीर झाल्या असून त्यांच्यावर नगर येथे उपचार चालू आहेत.