बीड

आ. संदिप क्षीरसागरांमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला बळकटी, सकाळी वांगीत करणार तीन कोटी चार लाख रूपयांच्या कामाचे उद्घाटन


बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : आ. संदिप क्षीरसागर यांच्यामुळे बीड मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी बळकटी मिळू लागली आहे. सकाळी त्यांच्या हस्ते तीन कोटी चार लाख रूपयांच्या कामाचे उद्घाटन होणार आहे. ही कामे घेवून आल्यामुळे त्यांच्या ग्रामस्थांमधून आभार मानले जात आहेत.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रजिमा 51 ते वांगी जाधववस्ती, वांगी ते बजगुडेवस्ती,वांगी ते शेलारवस्ती सहा किलो मिटर रस्ता सुधारणा अशा तीन कोटी चार लाख रूपयांच्या कामाचे सकाळी आ. संदिप क्षीरसागर हे उद्घाटन करणार आहेत. वांगी येथे सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. माजी आ.सय्यद सलीम, सुनिल धांडे, जेष्ट नेते अ‍ॅड डी.बी.बागल, जीवनराव बजगुडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर, सावता परिषदेचे कल्याण आखाडे, बीड पंचायत समितीच्या सभापती सारिका गवते, प्रकाश ठाकूर, नंदू कुटे, पंचायत समितीचे सदस्य उत्रेश्‍वर सोनवणे, पंचायत समितीच्या सदस्या कांता शिंदे, वांगीचे सरपंच रामहरी हाडुळे, नाळवंडीचे सरपंच राधाकिसन म्हेत्रे, मधूकर डाके,सुधिर सुपेकर, रवि मुंजाळ, दादासाहेब लांडे, अप्पा कदम, रामा येवले, दिलीप वाणी,माजी उपसभापती विलास आमटे, राजेंद्र पवार,दिपक हजारे,परमेश्‍वर काकडे,चौरंगनाथ पवार,सुरेश बंड,अमोल शिंदे,बापूराव चव्हाण,सुग्रिव मुंडे,मनोज बेद्रे,पिंटू जगताप, राम जाधव, शेळके गुरूजी यांच्यासह आदींची उपस्थिती राहणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!