बीड

2 जुलै रोजी खासदार संभाजीराजे बीडमध्ये, ” मराठा आरक्षणावर साधणार जन संवाद


बीड, दि. 30 : खा.युवराज संभाजीराजे छत्रपती हे दि .०२ जुलै रोजी बीड जिल्ह्याच्या दोरयावर येणार आहेत . यादरम्यान ते मराठा आरक्षण पार्श्वभूमीवर मराठा समाजातील सर्वच स्तरातील लोकांशी संवाद साधणार आहेत . ते अहमदनगर हुन आष्टी येथे दुपारी १२:३० येणार आहेत . तेथे सत्कार होईल , ०१:०० वाजता जामखेड येथे सत्कार , दुपारचे जेवन , २:३० वाजता पाटोदा येथे सत्कार , ०३:३० वाजता पिटीनायगाव येथे सत्कार व संवाद , ०३:३० वाजता मुर्शदपूर फाटा येथे सत्कार व संवाद , सायंकाळी ०५:०० वाजता बीड येथे आगमन यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून अभिवादन आणि चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येईल . या सत्कारासाठी मराठा समाजातील लोकांसह बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा बीड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे . यानंतर समर्थ लोन्स नगर रोड , बीड येथे ०५:३० वाजता ” आरक्षण जनसंवाद ” सत्यपरिस्तिथीचा व ईतर विषयांवर संवाद होणार असून या जनसंवादाला जनतेने उपस्थित राहावे . ३ जुलै बीड रोजी सकाळी ० ९ : ३० वाजता पाडळशिंगी , ० ९ : ४५ वाजता गढी कारखाना , १०:०० गेवराई येथे सत्कार होईल यानंतर थेट संभाजीनगर ( औरंगाबाद ) कडे रवाना होतील . या सर्व कार्यक्रमादरम्यान जास्तीत जास्त संख्येने सहभागी राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा बीड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे . या दौऱ्यादरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा समाजातील सर्व स्तरावरील लोकांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेणार आहेत . तसेच मराठा आरक्षणाच्या लढ्याला लवकरात लवकर यश मिळावे यासाठी देखील ते मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी संवाद साधणार आहेत .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!