महाराष्ट्र

झेपत नसेल तर राजीनामा द्या; पुण्याच्या महापौरांना सुप्रियाताईंनी सुनावले खडेबोल

झेपत नसेल तर राजीनामा द्या; पुण्याच्या महापौरांवर भडकल्या सुप्रिया सुळे

पुण्यातील आंबिल ओढ्यावरील घरांवर पुणे महापालिकेनं (Pune municipal corporation) कारवाई करत अनेक घरं जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईवरून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संताप व्यक्त केला आहे.

पुणे, 25 जून: मागील दोन दिवसांपासून पुण्यातील आंबिल ओढा (Ambil odha pune) अतिक्रमण प्रकरण महाराष्ट्राभर चांगलचं चर्चेत आहे. आंबिल ओढ्यावरील घरांवर पुणे महापालिकेनं (Pune municipal corporation) कारवाई करत अनेक घरं जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईवरून राष्ट्रवादीच्या नेत्या (NCP Leader) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. पुण्याच्या महापौरांना कारभार झेपत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. पुण्यातील आंबिल ओढ्यावरील कारवाईबाबत चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.

आंबिल ओढ्यावर कारवाई कोणी केली, हे सर्वांना माहित आहे. पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून त्यांनीच ही कारवाई केली आहे. या घटनेची चौकशी व्हावी. तसेच महापौरांनी याप्रकरणी उत्तर द्यावं. आणि हे सर्व झेपत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!