बीड, दि. 5 : पावसाची चाहुल लागली आहे . पेरणी हंगाम सुरू झाला आहे पण जिल्ह्यात डी.ए.पी. व युरीया खताची पुर्ण क्षमतेने उपलब्धता नाही . तरी याबाबत आपण लक्ष देऊन मुबलक प्रमाणात साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध करावा व शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी सहकार्य करावे, आशा सुचना खा. प्रीतमताईंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.