बीड

पोलीस अधिक्षकांचा दणका, अपह्रत मुलीच्या शोधासाठी 40 हजार मागणारा एपीआय निलंबित

बीड : अपह्रत मुलीच्या शोधासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यातील एपीआय अनिल गव्हाणकर याला अखेर निलंबित करण्यात आले आहे . पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी हा दणका दिला आहे, गव्हाणकर याने लाच मागितल्याची ऑडिओक्लिप समोर आल्याने खळबळ माजली होती . दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत एका मुलीच्या अपहरणाची तक्रार तिच्या नातेवाईकांनी केली होती . मात्र सदर मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाणे प्रमुख अनिल गव्हाणकर याने ४० हजाराची मागणी केली होती . यासंदर्भात मुलीच्या नातेवाइकांनी पोलीस अधीक्षकांची भेट देऊन तक्रार केली होती . तसेच संवादाची ऑडिओ क्लिप देखील दिली होती . या प्रकरणात अखेर ३ दिवसांनी एपीआय अनिल गव्हाणकर याला निलंबित करण्यात आले आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!