बीड

अखेर सराफा खून प्रकरणातील मुख्य आरोपी भारत राऊत यांनी पकडला, एलसीबीला आले मोठे यश

बीड – शिरूर येथील सराफा व्यापारी विशाल कुलथे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेने मोठ्या शिताफीने नाशिक मधून सोमवारी रात्री जेरबंद केले .तब्बल आठवडा भरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या त्याच्याकडून सोने आणि चांदी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . शिरूर तालुक्याला हादरवून टाकणारी घटना मागील आठवड्यात उघडकीस आली .शहरातील सराफा व्यापारी विशाल कुलथे हा बेपत्ता झाल्यानंतर शिरूर पोलिसांनी थातूर मातूर कारवाई केली .मात्र नातेवाईकांनी पाठपुरावा सुरू केल्यानंतर या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला . पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी आपली यंत्रणा कामाला लावून विशाल चा खून झाल्याचे उघडकीस आणत या प्रकरणातील तीन आरोपींना जेरबंद केले .मात्र मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड हा फरार होण्यात यशस्वी झाला होता .विशेष म्हणजे शिरूर पोलीस ठाण्याचे पो नि सिद्धार्थ माने यांनी त्याची किरकोळ चौकशी करून त्याला मोकाट सोडूनदिले होते . तब्बल आठवडा भरापासून आरोपी औरंगाबाद , नाशिक , नांदेड या भागात फिरत होता .पोलीस त्याला पकडण्यासाठी जायचे अन तो त्या जागेवरून पसार झालेला असायचा .पोलीस आणि आरोपी यांचा शिवना पाणीचा खेळ सुरू होता .स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राऊत यांना रविवारी मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला शोधण्यासाठी नाशिक ला पथक गेले .अखेर सोमवारी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले . M या आरोपीने आठ दिवसात औरंगाबाद ला एका मित्राच्या र र एक रात्र काढली , गुन्ह्यात वापरलेली गाडी तेथे सोडून त्या गाडी घेऊन आरोपी नाशिक ला गेला .तेथे सासुरवाडी च्या लोकांकडे राहिला , पुन्हा एक दिवस नांदेड ला गेला नाशिक येथे यापूर्वी जेथे काम करत होता त्या ठिकाणी देखील आरोपी ज्ञानेश्वर ने भेट दिली . आठ दिवसात आरोपीने स्वतःच्या मोबाईल चा वापर न करता मित्र आणि नातेवाईक यांच्या मोबाईल चा वापर करून शिरूर ला काय परिस्थिती आहे , पोलीस ऍक्शन कशी सुरुर आहे याची माहिती घेतली होती .मात्र आठ दिवसांनी का होईना आरोपी पोलिसांच्या हाती लागला .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!