बीड

कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणार्‍यांचा होणार सन्मान, मोदी सरकारची सप्तवर्षपूर्ती आणि मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त सलीम जहाँगीर यांचा उपक्रम


बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारच्या सप्तवर्षपुर्ती आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त लोकनेत्या पंकजाताई मुंडे , खा. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.31 मे ते दि.3 जून या कालावधीत भाजप नेते सलीम जहाँगीर यांच्यावतीने कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणार्‍या कंत्राटी नर्स आणि वार्ड बॉय शववाहिका वाहून नेणारे, अंत्यविधी आणि दफनविधी करणार्‍या कर्मचार्‍यांचा कोविड वीर सेवक म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात मोदी सरकारच्या सप्तवर्षपूर्ती निमित्त आणि दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी पासून कोविड काळात जिल्हा रुग्णालयासह कोविड केंद्रात रात्रं दिवस काम करत स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणार्‍या कंत्राटी नर्स आणि वार्ड बॉय , शववाहिका वाहून नेणारे, अंत्यविधी आणि दफनविधी करणार्‍या कर्मचार्‍यांचा भाजप नेते सलीम जहाँगीर यांच्यावतीने प्रमाणपत्र देऊन देऊन त्यांचा ह्दय सत्कार केला जाणार आहे.जिल्हा रुग्णालयासह प्रत्येक उप जिल्हा रुग्णालय आणि तालुका रुग्णालयात कर्तव्य बजावणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. परळीत खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते , बीडमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के , सलीम जहाँगीर अन्य पदाधिकर्‍यांचा हस्ते तर गेवराईत आ. लक्ष्मणअण्णा पवार , आष्टी – पाटोदा – शिरूरमध्ये आ.सुरेश धस, केज – अंबाजोगाईत आ. नमिताताई मुंदडा , माजलगावमध्ये रमेशराव आडसकर यांच्या हस्ते आणि भाजप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कोविड वीर सेवक यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!