बीड प्रतिनिधी/ लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील बीड- पालवन -चौक भाळवणी -लिंबागणेश रस्ता मंजुरीकरिता जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र मस्के यांनी तत्कालीन ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचेकडे पाठपुरावा करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चौदा कोटींचा हा रस्ता मंजूर करून घेतला. आज या रस्त्यावरून वाहतूक सुरळीतपणे चालू आहे.
या रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी पंकजाताई मुंडे आल्या असताना पिंपळवाडी भाळवणी या परिसरातील महिलांनी पिंपळवाडी बिंदुसरा नदीवर पूल बांधका करण्याची मागणी केली होती.
त्यावेळी पंकजाताई मुंडे यांनी या पुलाचा प्रस्ताव तयार करून घेतला होता. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी ताईंच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याला मंजुरी प्राप्त करून घेतली आहे. साडेपाच कोटी रुपयांचा निधी या पुल बांधकामासाठी मंजूर झाला असून काही दिवसात या नदीवरील पूल बांधकामास सुरुवात होईल. अशी माहिती राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.
बीड पिंपळवाडी भाळवणी- लिंबागणेश हा रस्ता तसा जुनाच परंतु बिंदुसरा नदीवर पूल नसल्याने डोंगर पट्ट्यातील ग्रामस्थांची वाहतुकीसाठी वाहतुकीसाठी अडथळा होत असे. पावसाळ्यामध्ये तर वाहतुकीसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत असे. दही भाजीपाला विकण्यासाठी येणाऱ्या रोजच्या ग्रामस्थांना व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी नदीतून पायी प्रवास करावा लागत असे. अतिवृष्टीच्या काळामध्ये तल दोन तीन दिवस वाहतूक ठप्प होत असे. यावेळी जनतेचे हाल होत असत. वाहतुकीसाठी पूलाची नितांत आवश्यकता होती. जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर राजेंद्र मस्के यांनी पालवन चौक- भाळवणी ते लिंबागणेश आणि पिंपळवाडी बिंदुसरा नदीवरील पूल बांधकामास प्रथम प्राधान्य देऊन तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा ताई मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून या दोन्ही कामांना मंजुरी प्राप्त करून घेण्यात यश संपादन केले आहे.
या पुलामुळे डोंगर पट्ट्यातील वाहतूक अत्यंत सुलभ होणार आहे. या पुलाच्या मंजुरी मुळे या भागातील रस्ता वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे.
राजेंद्र मस्के राजेंद्र मस्के जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून या गटातील अनेक रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून
या परिसरातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. विकास कामांचा पाठपुरावा करून विकास कामांना गती दिली आहे पिंपळवाडी बिंदुसरा नदीवरील
अत्यंत महत्त्वाच्या पुल कामास मंजुरी प्राप्त करून घेतल्यामुळे डोंगरपट्ट्यातील जनता समाधान व्यक्त करत असून भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे अभिनंदन करत आहे.