बीड

मोठा दिलासा, जिल्ह्यात चावीस तासात एकही मृत्यू नाही, बाधितांची संख्याही झपाटाने घटू लागली, 536 नवे रूग्ण तर 833 रूग्ण बरे होवून घरी परतले


बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : शनिवारी बीड जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. मागच्या 24 तासात कोरोनाने एकही मृत्यू झाला नाही तर कोरोनाची संख्याही जिल्ह्यात झपाट्याने घटू लागली आहे. शनिवारी जिल्ह्यात साडे पाच हजार चाचण्यांचा अहवाल प्राप्त झाला, यामध्ये 536 नवे रुग्ण आढळून आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे जिल्ह्यात दिवसभरामध्ये 833 रूग्ण कोरोना मुक्त होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यातून शुक्रवारी 5679 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले, त्यामध्ये 536 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 5143 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 153, अंबाजोगाई 19, आष्टी 73, धारूर 22, गेवराई 53, केज 57, माजलगाव 46, परळी 12, पाटोदा 23, शिरूर 52 तर वडवणी तालुक्यात 26 रुग्ण आढळून आले. दरम्यान, प्रतिदिवस आढळणारी रुग्णसंख्या दीड हजारांवरून 500 वर जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. मागच्या चोविस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकही मृत्यू झाला नाही, तर दिवसभरात 833 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत.

म्युकर मायकोससीची संख्या सात वाढली
एका बाजूने कोरोनाची संख्या घटत आहे तर दुसर्‍या बाजूने मात्र म्युकर मायकोससीची संख्या वाढताना दिसून येत आहे. शुक्रवारच्या अहवालात म्युकर मायकोसीसची जिल्ह्यात एकूण संख्या 96 होती, यामध्ये शनिवारी सात रूग्णांची भर पडून तो एकूण आकडा आता 103 वर गेला आहे. यापैकी सध्या 69 रूग्ण उपचार घेत आहेत. 17 बरे झाले आहेत तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!